सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महिलांचा सोने खरेदीकडे कल
पीएनजी तर्फे आयोजित 'मंगळसूत्र महोत्सवाला प्रतिसाद

चांदा ब्लास्ट
श्रावण महिन्यापासून सणासुदीच्या काळाला सुरुवात झाली असून आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांचा सोने खरेदीकडे कल वाढलेला दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पीएनजी ज्वेलर्स यांचा प्रतिष्ठित आणि बहुप्रतीक्षित ‘मंगळसूत्र महोत्सव’ ला महिलांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. १७ ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात या वर्षी पहिल्यांदाच १८ कॅरेट सोन्यातील मंगळसूत्रे पीएनजी ज्वेलर्सने उपलब्ध केली असून या मंगळसूत्र महोत्सवाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, “२१ वर्षांचा हा प्रवास आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे. यावर्षी प्रथमच आम्ही १८ कॅरेट सोन्याचे मंगळसूत्र बाजारात आणत आहोत. जे आजच्या काळातील स्मार्ट आणि स्टायलिश महिलांसाठी खास आहे. परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम असलेल्या या महोत्सवातून प्रत्येक स्त्रीचे व्यक्तिमत्त्व, तिची स्टाईल आणि मूल्य यांचा सन्मान करत आम्ही विश्वासार्हतेची आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा जपत राहू.” हा महोत्सव म्हणजे पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणारा एक अद्वितीय उपक्रम आहे. जिथे सौंदर्य, गुणवत्ता आणि संस्कृती यांचे दर्शन घडते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगळसूत्र महोत्सवात पारंपरिकता आणि आधुनिकतेचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे. ७ वेगवेगळ्या प्रकारांत – पारंपरिक, आधुनिक, हलक्या वजनाचे, ऐतिहासिक, पोल्की, हिरे आणि गोकाक यांचे २००० हून अधिक डिझाइन्स महाराष्ट्र आणि गोव्यातील पीएनजी ज्वेलर्सच्या सर्व शाखांमध्ये सादर करण्यात येणार आहेत.
मंगळसूत्र महोत्सवानिमित्त ग्राहकांना सोन्याच्या मंगळसूत्राच्या घडणावळीवर ५० टक्के पर्यंत सवलत आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्राच्या घडणावळीवर १०० टक्के पर्यंत सवलत मिळणार आहे. त्यामुळे मंगळसूत्र खरेदीसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.