राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २३० व्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन आज

चांदा ब्लास्ट
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २३० व्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम चैतन्य ज्येष्ठ नागरिक सभागृह, महेश नगर, चंद्रपूर येथे दुपारी ठीक ३ वाजता पार पडणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
डॉ. मंगेश मधुकर गुलवाडे
(अध्यक्ष, धनगर समाज सेवा मंडळ, जिल्हा चंद्रपूर) राहणार आहेत.
प्रमुख वक्त्या म्हणून
मान. प्रा. सौ. योगिनी देगमवार,
तर प्रमुख अतिथी म्हणून
मान. प्राचार्या शोभा चंद्रा रेड्डी आणि
मान. वामनराव मंदे (जेष्ठ कार्यकर्ते) उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात चालू वर्षात शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या बंधू-भगिनींचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात येईल. तसेच उपस्थितांसाठी शुगर व बीपी निःशुल्क तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, ज्याचा लाभ समाज बांधवांनी घ्यावा.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला मंडळ, चंद्रपूर आणि धनगर समाज सेवा मंडळ जिल्हा चंद्रपूर (रजि. नं. 45/2023) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.