एस.एन.डी.टी.विद्यापीठात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ,मुंबई चे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त १२ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने वाचनसंस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वृद्धिंगत व्हावी असा उद्देश्य असतो.
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ,मुंबई चे चंद्रपूर येथील केंद्र महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथेही विद्यापीठाचे संचालक डॉ.राजेश इंगोले व सहायक कुलसचिव डॉ.बाळू राठोड यांच्या उपस्थितीत ग्रंथपाल दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करण्यात आले तसेच वाचकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले या प्रसंगी समन्वयक मा.वेदानंद अलमस्त, कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक मा.स्नेहा लोहे तसेच सर्व प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.