ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीमेचा पहिला टप्पा पुर्ण, 5 टक्के दुषित घरे

दुसऱ्या टप्प्यात दूषित आढळल्यास होणार दंड  

चांदा ब्लास्ट

कंटेनर सर्वे मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व घरांच्या तपासणीचा पहिला टप्पा पुर्ण झाला असुन यात 5 टक्के घरे दुषित आढळली आहेत. ब्रिडींग चेकर्सद्वारा 250 घरांची दररोज तपासणी केली जात असुन दुसऱ्या तपासणीत जर पुन्हा तीच घरे दुषित आढळली तर त्यांना नोटीस देऊन दंडीत केले जाणार आहे.

  डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांच्या प्रतिबंधास पुढील काही दिवस महत्वाचे आहेत. 2 वर्षांपुर्वी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत डेंग्युचे 265 रुग्ण मनपा हद्दीत आढळुन आले होते. मागील वर्षी ही संख्या अत्यंत कमी होती, मात्र ज्या घरांमध्ये रुग्ण आढळले होते त्यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात डॉ. नयना उत्तरवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात या मोहिमेत मनपाने नेमलेले 28 ब्रिडींग चेकर्स,32 एएनएम, 22 एमपीडब्लु व 170 आशा वर्कर प्रत्यक्ष सहभागी आहे तसेच स्वच्छता निरीक्षक यांचाही सहभाग आहे.

   संततधार पावसाने मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये