ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुस शहर संघटकपदी इंजि. अमित बोरकर यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर : आठ महिन्यांपूर्वी आम आदमी पार्टीचे घुग्घुस शहराध्यक्ष इंजि. अमित बोरकर, काँग्रेसचे माजी सदस्य गणेश उईके व काँग्रेस वरिष्ठ नेते पवन नागपूरे यांनी हेमराज बावणे यांच्या नेतृत्वात आणि जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या विश्वासावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला होता.

मागील आठ महिन्यांतील कार्याचा गौरव करत ११ ऑगस्ट २०२५ रोजी चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत दादा कदम यांच्या पत्राद्वारे आणि जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या सहयोगाने इंजि. अमित बोरकर यांची घुग्घुस शहर संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.

नियुक्तीपत्र देताना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी घुग्घुस शहरातील संघटन अधिक मजबूत करण्याची जबाबदारी देत, येणाऱ्या पहिल्या घुग्घुस नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (उ.बा.ठा) चा पहिला नगराध्यक्ष निवडून यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, माजी जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे, शिवसेना शहरप्रमुख बंटी घोरपडे, बाळू चिकनकर, ज्येष्ठ शिवसैनिक रघुनाथ धोंगडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमराज बावणे, युवासेना शहरप्रमुख चेतन बोबडे, उपशहर प्रमुख अनुप कोंगरे, उपतालुका प्रमुख योगेश भांदक्कर, अजय जोगी, गणेश उईके, किशोर चौधरी, वेदप्रकाश मेहता आणि इतर शिवसैनिक, युवा सैनिक उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये