ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हर घर तिरंगा अंतर्गत भव्य प्रदर्शनीचे आयोजन

चांदा ब्लास्ट

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत विविध देशभक्तिपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय, बी.पी.एल. कार्यालय येथे महिला बचतगटांच्या माध्यमातून स्थानिक कलाकृतींचे भव्य प्रदर्शन 2 ते 8 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आले.

   या प्रदर्शनामध्ये भारतीय राष्ट्रध्वजाचे तीन रंग वापरून पारंपरिक विणकाम व धाग्यांच्या माध्यमातून तयार केलेल्या अद्वितीय कलाकृती विशेष आकर्षण ठरल्या. तसेच पारंपरिक हस्तकला, हातमाग वस्त्रनिर्मिती, चित्रकला, मातीची भांडी, भरतकाम, सजावटी वस्तू, देशभक्तिपर चित्रे व स्थानिक खाद्यपदार्थांचा समावेश होता. प्रदर्शनीत एकूण 17 महिला बचतगटांनी उत्साहाने सहभाग घेतला.

  सहभागी महिला व स्थानिक कलाकारांनी आपली उत्पादने मांडून स्वावलंबन, कौशल्यविकास आणि “वोकल फॉर लोकल” या संकल्पनेचा संदेश दिला.प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देशभक्तिपर गीते, सांस्कृतिक कार्यक्रम आणि तिरंगा आधारित कलाविष्कारांनी संपूर्ण वातावरण देशप्रेमाच्या भावनेने भारावून गेले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित विभाग, महिला बचतगट, स्थानिक कलाकार, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी सहकार्य केले.

“हर घर तिरंगा” अभियान हा केवळ तिरंगा फडकविण्याचा कार्यक्रम नसून, स्थानिक सहभाग, सामाजिक एकजूट आणि स्वावलंबन यांचा उत्सव आहे – आयुक्त विपीन पालीवाल

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये