तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविम्यासाठी फार्मर आयडीतून सूट
विहित मुदतीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा; तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती : जिवती तालुक्यातील सातबारा ऑनलाइन झाला नसल्याने जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टल वर अर्ज करता येत नव्हते. परिणामी तालुक्यातील शेतकरी पिक विम्यासह इतर शासकीय योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. मात्र, केंद्रशासनाच्या आदेशानुसार जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना ऍग्रिस्टॅक फार्मर आयडीपासून सूट देण्यात आली असून पिक विमा भरणेकरिता अंतिम मुदत १४ ऑगस्ट २०२५ ही आहे. म्हणजेच शेतकऱ्यांकडे फक्त चार दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा पोर्टल वर आपल्या लागवडीखालील पिकाचा पिक विमा उतरवून आपले पिक संरक्षित करावे. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी माधुरी गावडे यांनी केले आहे.
खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ करीता उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई ही अंमलबजावणी यंत्रणा म्हणून निवडण्यात आली आहे. योजनेत खरीप व रब्बी हंगामातील पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या काळात नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कारणांमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई मिळणार आहे.
– ज्वारीसाठी विमा संरक्षित रक्कम ३३ हजार,भरावयाचा हप्ता ८२.५० रू. सोयाबीनसाठी विमा संरक्षित रक्कम ५८ हजार, भरावयाचा हप्ता ५८० रु.तुरीसाठी विमा संरक्षित रक्कम ४७ हजार, भरावयाचा हप्ता ११७.५० रु. कापूससाठी विमा संरक्षित रक्कम ६० हजार, भरावयाचा हप्ता १,२०० रु.