ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुसमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (चंद्रपूर) – नवएकता जयसेवा बहुउद्देशीय संस्था, चांदागढ यांच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.

ही शोभायात्रा अमराई येथील कुंवारा भिवसेन पेनठाणा येथून सुरू होऊन गांधी चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पोहोचली. स्मारक परिसरात शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.

शोभायात्रेत सहभागी समाजबांधवांसाठी काँग्रेस अध्यक्ष राजु रेड्डी यांच्या वतीने मसाला भाताचे आयोजन करण्यात आले होते. थकलेल्या नागरिकांना सेवा देण्याचा हा काँग्रेसतर्फे छोटासा प्रयत्न असल्याचे मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या प्रसंगी कामगार नेते अनवर सैय्यद, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, कुमार रुद्रारप, सचिन नागपुरे, सुनील पाटील, शहंशा शेख, अंकुश सपाटे, रंजीत राखुंडे, निखिल पुनगंटी, कपिल गोगला तसेच मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये