ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक दुचाकी स्वार ठार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी :- तालुक्यात अपघाताची शृंखला दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाहतुकीच्या नियमांचा वाहन चालक भंग करीत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. ब्रह्मपुरी आरमोरी रोडवरील बेटाळा फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुपारच्या सुमारास दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची आज 10 ऑगस्ट 2025 ला घटना उघडकीस आली आहे.

ब्रह्मपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मपुरी आरमोरी रोडवरील बेटाळा फाट्याजवळ अज्ञात वाहनाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली.

या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दुचाकी स्वाराचे नाव अभिमन पंढरी दोनाडकर वय 55 वर्ष राहणार बरडकिन्ही असल्याचे कळते. ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी येथे पाठविला आहे. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये