लाडक्या बहिणींचा रक्षाबंधन सोहळा संपन्न
आमदार करण देवतळे यांच्या हस्ते पार पडला उद्धाटन सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
आमदार करण देवतळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, विधानसभा समन्वयक रमेश राजूरकर, सुषमाताई शिंदे व वेदांती करण देवतळे यांचे प्रमुख उपस्थितीत यभाजपा महिला आघाडी तर्फे आयोजित रक्षाबंधन कार्यक्रम शिंदे मंगल कार्यालय इथे संपन्न झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार करण देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनी उपहार योजनेचा लाभ घेतला. व्यासपीठावर आमदार करन देवतळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, रमेश राजूरकर, शहर अध्यक्ष सुनील नामोजवार, माजी जिल्हा परिषद सदस्य,विजय वानखेडे, तालुका अध्यक्ष श्यामाभाऊ उरकुडे, सिकंदर शेख, माधव बांगडे, युवा मोर्चा प्रमुख विशाल ठेंगणे सुषमा ताई शिंदे, महिला अध्यक्षा वृषाली पांढरे, वेदांती देवतळे, आशाताई ताजने तालुका अध्यक्षा रक्षिता निरंजने आदी उपस्थित होते.
उपस्थिती लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना, सुकन्या समृद्धी योजना, लेक लाडकी योजना, पंतप्रधान उज्वला योजना आदी योजनेची माहिती देण्यात आली. रक्षाबंधन सारख्या पवित्र सणाचे औचित्य साधून रविंद्र शिंदे व आमदार यांनी लाडक्या बहिणीं विषयी आपली बांधिलकी कायम राहील अश्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे संचालन ॲडवोकेट उल्का पद्मावार, प्रास्ताविक आशा ताजने यांनी केले. उपस्थित लाडक्या बहिणींनी पाहुण्यांना राख्या बांधून भाऊ बहीण नात्याचा स्नेह व ऋणानुबंध वृद्धिंगत केला.