ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालयात जागतिक आदिवासी दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

– सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे 9 ऑगस्ट ला जागतिक आदिवासी दिवस तथा क्रांती दिवस या निमित्ताने क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक महेंद्र कुमार ताकसांडे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रशांत खैरे, सुरेश पाटील ,ज्योती चटप , राजेश मांढरे ,उपस्थित होते या प्रसंगी जागतिकआदिवासी दिन तथा क्रांती दिन याविषयी मार्गदर्शकांनी विचार व्यक्त केले तसेच इतिहासाचा मागावा घेतला, स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे असे आव्हान करण्यात आले.

कार्यक्रमांचे संचालन बी एम मरसकोले यांनी तर आभार प्रदर्शन जीवन आडे यांनी केले कार्यक्रमासाठी प्रा. झाडे प्रा. मेरकुरे प्र. जयहीर जी एन बोबडे, चंद्रभान किनाके,स्नेहल चांदेकर प्रा कु सोजल ताकसांडे ,लीलाधर मते , शशिकांत चेन्ने शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये