ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पत्रकार दिलीप मांढरे भोई गौरव हिरकणी पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती येथील जेष्ठ पत्रकार तथा भोई समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते दिलीप मांढरे यांना नागपूर येथील हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरंग सभागृहात दिनांक १० ला भोई गौरव प्रतिष्ठान तर्फे भोई गौरव हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सदर पार पडलेल्या कार्यक्रमाला दैनिक सकाळचे निवासी संपादक प्रमोद काळबांडे, सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर विकास महात्मे, प्राचार्य कृष्णाजी ढोले,गटविकास अधिकारी नारायण आमझरे, भोई गौरव चे संपादक चंद्रकांत लोणारे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल दिलीप पांढरे यांचे शहरात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.