बसस्थानक परिसरात भर दिवसा कारमधून पैशाची बॅग व मोबाईल लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथे बस स्थानक परिसरात असलेल्या चौडेश्वरी भोजनालय च्या बाजूला उभ्या असलेल्या कारमधून भर दिवसा अज्ञात व्यक्तीने पैशाची बॅग व 2 मोबाईल लंपास केल्याची घटना 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता घडली.
सविस्तर वृत्त असे की, डॉ विठ्ठल श्रीकृष्ण देशमुख यांनी त्यांची कार क्रमांक MH-28-BQ-3303 त्यांच्या श्रीकृष्ण बाल रुग्णालय च्या समोर रोडवर उभी करून दवाखाण्यात गेले व परत थोड्या वेळाने बाहेर येऊन बघितले असता त्यांनी गाडीत ड्रायव्हर सिटच्या बाजुच्या सिटवर ठेवलेली निळया कलरची बॅग ज्यामध्ये नगदी 7000/-रूपये व दोन मोबाइल किमत 22000/-‘रूपये व इतर सामान असा एकुण 29,000/-रूपये चा मुददेमाल व इतर सामान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला.
घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलकेला असुन पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल भास्कर सानप करीत आहे.