ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीतीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात 

हजारोच्या संख्येने समाज बांधवांची उपस्थित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- मूळनिवासी एकता संघर्ष समितीच्या वतीने जागतिक मूळनिवासी दिनाचे औचित्य साधून भव्य रॅली व महोत्सवाचे आयोजन केले होते.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासींचे मोठे योगदान आहे परंतु आमचा इतिहास चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आल्याची खंत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

शिक्षणातून नव्या पिढीचे कल्याण होते हे स्पर्धेचे युग आहे आता त्यासाठी गावागावात शैक्षणिक वातावरण निर्माण करा जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर महान व्यक्तीचे चरित्र अभ्यासात येऊन त्यातून मिळणारी स्फूर्ती तुमच्या जीवनाचे कल्याण करेल नव्या पिढीने शिक्षणासोबत समाजाची संस्कृती जोपासण्याची गरज आहे असे कार्यक्रमाचे मार्गदर्शक सुधाकर कन्नाके यांनी केले. मूळनिवासी समाज अतिमागास व अज्ञानी असल्याने अनेक समस्या आहेत शिक्षणाचा अभाव असंघटित नसल्यामुळे आपली परिस्थिती आहे तसेच आहे आता ती परिस्थिती बदलण्याची समाजाला शिक्षित व संघटित होण्याची गरज आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक गजानन जुमनाके यांनी केले. तर

आपल्या तालुक्यात आदिवासी समाजाची अशिक्षितपणाचा फायदा घेत काही दलाल आर्थिक पिळवणूक करीत आहे त्यासाठी समाजाने अशा लोकांकडून सावध राहावे त्यांना कायदेशीर लढा देण्यासाठी सजग असावे अध्यक्षस्थानी भीमराव पा.मडावी यांनी प्रतिपादन केले.

याप्रसंगी भीमराव मेश्राम माजी सभापती, बाजीराव वलका माजी सरपंच, सतलुबाई जुमनाके नगरसेविका, लक्ष्मीबाई जुमनाके नगरसेविका,जमालोद्दीन शेख उपनगराध्यक्ष, नामदेव जुमनाके संचालक, लिंगोराव सोयाम, मुख्याध्यापक राठोड, केशवशाह आत्राम, सोनेराव पेंदोर, ज्योतिरावन गावंडे, गोविंदराव कुमरे , हनुमंत कुमरे माजी सरपंच, कोलाम समाजाचे नानाजी मडावी, हिशतराव आत्राम, शामराव गेडाम, शिवाजी नैताम, ममताजी जाधव नगरसेवक,आनंदराव शेडमाके, लिंबाराव पा. सिडाम यांची उपस्थिती होती.

यावेळी तालुक्यातील गावागावात आदिवासी समाजातर्फे रॅली काढून एकतेचा नारा देत जिवती शहरात भव्य रॅली काढण्यात आले.

प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष लक्ष्मण मंगाम यांनी केले, संचालन सचिव सिताराम मडावी व कोषाध्यक्ष कट्टू कोटनाके यांनी आभार केशव कुमरे, मोहन आत्राम यांनी मानले. आयोजनाकरिता मारुती कुमरे, शिवाजी कोहचळें, झाडू कोडापे, विजय जुमनाके, हनुमंत कन्नाके, जुगदराव सिडाम, तुकाराम धुर्वे, तुषार मडावी, अनिता धुर्वे, भीमराव जुमनाके , केशव आत्राम, दिनेश सोयाम, विलास मेश्राम, निलेश मेश्राम, भीमराव मेश्राम, अनिल आडे तसेच तालुक्यातील सर्व गाव पाटील सामाजिक कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.

गावपाटील व गुणवंत प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

तालुक्यातील आदिवासी समाजाचे गाव पाटील पिवळा दुपट्टा व मोरपंख देऊन तर वर्ग १०वी, १२वी परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर

शासकीय आश्रम शाळेतील ममता कोवे, सोनाक्षी कन्नाके उत्कृष्ट भाषण व गोंडी गितगायन तसेच तुषार मडावी यांनी मनोगत व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये