नागपूरात वसंत यौद्धा पुरस्कार सोहळा थाटात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ज्ञानप्रकाश लोकसंस्थेद्वारा ” परसबाग असावी दारी.,, या कार्यक्रमाअंतर्गत दिला जाणारा वसंत यौद्धा पुरस्कार सोहळा थाटात संपन्न झाला. श्रीकांत राठोड यांच्या सामाजिक क्षेत्रातील असाधारण कार्याच्या सन्मार्थ हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.सोबत विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार समारंभ पार पडला ज्यात प्रयोगशिल आणि उद्यमशिल शेतकरी मा.अजयभाऊ संगीडवार,मूल जि. चंद्रपूर, जनसेवा आणि जैविकशेती प्रचारक मा.रामराव चव्हाण, माजी.जि.प. सदस्य,यवतमाळ,पुसद आणि रूग्न सेवेत अविश्रांतपणे कार्य करणारे मा. कुंदन शेरे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे उद्घाटक मा.प्रविण पवार,आय आय टी गुरुकुल,नागपूर अध्यक्षस्थानी नागपूर नगरीचे नायक मा.इंजि.आत्माराम चव्हाण, प्रमुख पाहुणे कारभारी अॅड. बद्रीप्रसाद चव्हाण होते. प्रमुख मार्गदर्शक सुपसिद्ध व्याख्याते मा.कॅप्टन एल.बी.कलंत्री, मा.संचालक रेशीम,महाराष्ट्र शासन,मा.ज्ञानेश्वरजी रक्षक,अभ्यासक,लेखक, व्याख्याते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा आणि मा.सुभाष जाधव, संवर्ग विकास अधिकारी, पं.स.पारशिवनी होते.कार्यक्रमाची सुरुवात समग्र क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पकार,कतृत्वाला आदरांजली व दिप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीपतभाऊ राठोड यांनी केले.
प्रारंभी कु.अंजली व कु.दिपाली राठोड या शाळकरी मुलींनी हिंदी व इंग्रजी भाषेतून वसंतराव नाईक यांच्या कार्यावर आपले विचार व्यक्त केले. सौ. जयश्रीताईच्या सोचोनी गोरभाई या बंजारा भाषेतील स्वरचित गीतांने समाजाच्या समस्यांवर मार्मिकपणे प्रकाश टाकला. याप्रसंगी सर्व सत्कार मुर्तीच्या कार्याचे प्रतिबिंब चित्रफितीद्वारे दर्शविण्यात आले तर वसंत यौद्धा पुरस्कार प्राप्त मा. श्रीकांत राठोड यांचे खैरी पन्नासे व इतर सामाजिक कार्याची व्हिडीयो क्लीप दाखविण्यात आली, याप्रसंगी खैरी पन्नासेच्या नागरीकांचा व कार्यकत्याचा सामुहिक सन्मान करण्यात आला.
आपल्या भाषणात प्रमुख मार्गदर्शक मा.कॅप्टन एल.बी.कलंत्री आणि मा. ज्ञानेश्वरजी रक्षक यांनी सर्व सत्कारमुर्ती कार्याला अधोरेषित करुन त्यांना प्रोत्साहित केले.त्याचप्रमाणे राठोड दांपत्याचे कार्य समाजोपयोगी,दिशादर्शी,प्रेरणादायी आणि अनुकरणीय असल्याचे आवर्जून प्रतिपादन केले. कार्यक्रमाला नागपूर नगरीतील सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे संचलन ज्ञानप्रकाशच्या जयश्रीताई श्रीपत राठोड यांनी सुरेखपणे पार पाडल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेषता बंजारा बांधवाचे मोलाचे योगदान लाभले. श्रीपतभाऊ राठोड यांनी आभारप्रदर्शनानी कार्यक्रमाची सांगता केली.