WHO येथे कार्यरत वरिष्ठ शास्त्रज्ञ यांची निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाला सदिच्छा भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती. येथे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO)अंतर्गत कार्यरत (GARDP) ग्लोबल अँटिबायोटिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट पार्टनरशिप या संस्थेमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून जबाबदारी सांभाळणारे डॉ. रवींद्र पंजाबराव जुमडे यांनी सदिच्छा भेट दिली.
सदर भेटीमध्ये भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक नि. शिंदे, सहसचिव कार्तिक नि. शिंदे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांच्याशी संवाद साधला. या संवादामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या उच्च शिक्षणाच्या परदेशातील अनेक संधी तसेच त्यासाठी लागणारे शिक्षण आणि अनुभव या विषयी आवश्यक अशी माहिती सांगितली.
आपले अनुभव सांगत असताना डॉक्टर रवींद्र जुमडे यांनी शाळा, महाविद्यालय, पीएचडी नंतर पोस्टडॉक आणि आता वरिष्ठ शास्त्रज्ञ हा सर्व प्रवास उलगडून सांगितला आणि या प्रवासामध्ये केलेले प्रयत्न आलेले कष्ट याविषयी सुद्धा सविस्तर अशी चर्चा केली या चर्चेमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग सुद्धा उपस्थित होता त्यांनी सुद्धा डॉ. रवींद्र जुमडे यांचे विचार ऐकल्यानंतर निश्चितच विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उपलब्ध असणाऱ्या संधी विषयी माहिती देणार असल्याचे ग्वाही दिली