ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

किल्लावार्ड वाशीयांचा शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश

शिवसेना शिंदे गटाच्या मोहीमेला सुरुवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        शिवसेना (UBT) तसेच इतर पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या विकासदृष्टी, जनहितकारी कामगिरी आणि लोकाभिमुख धोरणांनी प्रभावित होऊन किल्ला वार्ड येथील वार्ड वाशीयांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.

या पक्ष प्रवेश कार्यक्रमात शालू घनश्याम महेशकर, घनश्याम सखाराम महेशकर, मोहन मारगोवार, सचिन अशोक कत्तुरवार, गजानन महादेव उके तसेच असंख्य विविध पक्षांचे कार्यकर्ते भगव्या पताकेखाली एकत्र आले.

कार्यक्रमाला शिवसैनिक सुरज भाऊ शाहा यांच्या नेतृत्वाचा ठसा उमटला. त्यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या भगव्या पताकेखाली एकत्र येऊन जनतेची सेवा करण्याचा संकल्प केला. यावेळी युवा शिवसैनिक सुमित हस्तक यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित शिवसैनिकांनी ठाम शब्दांत सांगितले की, “शिंदे साहेबांची विकासाची गती, जनतेशी असलेला थेट संपर्क व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तत्पर तोडगा हीच खरी राजकारणाची दिशा आहे आणि याचसाठी आम्ही शिवसेना (शिंदे गट) मध्ये आलो आहोत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये