गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर पाथरी येथील ठाणेदार यांनी सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
गणेशोत्सव हा श्रद्धेच्या आणि आनंदाच्या उत्सव आहे तो शांततेत आणि सुरक्षिततेत साजरा करावा, नितेश डोर्लीकर, ठाणेदार पाथरी.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाथरी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या सर्व गणेश मंडळाचा पदाधिकाऱ्यांची ठाणेदार यांनी शुक्रवार रोजी बैठक घेऊन सूचनांचे पालन करून हा उत्सव शांततेत पार पाडण्याकरिता पोलिसांना सहकार्य करण्यासंदर्भात तसेच सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना दिल्यात यामध्ये 1) मूर्ती स्थापन करण्याअगोदर आवश्यक असलेल्या कागदपत्रासह ऑनलाइन अर्ज सादर करावा.2) दैनंदिन वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.3) मंडपाची उभारणी करतेवेळी पाणी गळणार नाही याची खबरदारी घेऊन मंडप मजबूत तयार करावा.4) मिरवणुकी दरम्यान मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मद्य प्राशन करून राहणार नाही. 5) मिरवणुकीत डीजे व त्यासारखे ध्वनी प्रदूषण करणारे वाद्य ठेवणार किंवा वाजवणार नाही जर ती आढळल्यास जप्त करण्यात येईल. 6) अनुचित प्रकारावर लक्ष केंद्रित करण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे लावावे व महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घ्यावी.7) कोणत्याही समाज जाती धर्माच्या भावना दुखावणार नाही याची विशेष खबरदारी घ्यावी.अशा सूचना करीत गणेशोत्सव हा श्रद्धेच्या आणि आनंदाच्या उत्सव आहे तो शांततेत आणि सुरक्षीततेत साजरा होणे गरजेचे आहे याकरिता सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याकडून पोलिसांना सहकार्य करावे व हा उत्सव शांततेत पार पाडण्यास पोलिसांना सहकार्य करण्याचे आव्हान या बैठकीच्या माध्यमातून ठाणेदार यांनी नागरिकांना सुद्धा केला आहे.
यादरम्यान ठाणेदार नितेश डोर्लीकर,खेलेश कोरे, अमीत मस्के, बळीराम बारेकर, यशवंत कोसमशिले, येनुनाथ मडावी, विकेश वनस्कर, राजकुमार सिडाम व पाथरी पो. स्टे. हद्दीतील सर्व गणेश मंडळांनी या बैठकीत उपस्थिती दर्शवली.