श्री संत मुरलीधर बाबांच्या अवतरण दिनी भक्तगणांंनी दिल्या कोटी- कोटी शुभेच्छा
श्री संत मुरलीधर बाबांचा अवतरण दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ शेखर प्यारमवार
जिल्ह्यासह परप्रांतीय भक्तगणांनी अलोट लावली गर्दी
चंद्रपूर – गडचिरोली सिमेलगत बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीलगत असलेल्या तालुक्यातील पारडी ( हरणघाट ) येथील मुरलीधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिर येथे श्री संत मुरलीधर महाराज यांचा अवतरण दिन मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.
श्री गुरु प. पु .संत श्री ब्रम्हकालीन कार्तिक स्वामी महाराज यांच्या कृपेने व श्री हनुमानजी प्रभु यांच्या आर्शिवादाने श्रावण शु .प . तथा श्री मूरलीधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्ट हरणघाट ( पारडी ) च्या वतीने बाबांच्या अवतरण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भास्कर कुदांवार, विठ्ठलजी गुंजनवार , नंदाताई गुंजनवार ,मंदीर समिती सचिव सुभाष नागुलवार ,नरेंद्र जकुलवार राकेश गोलेपल्लीवार ,सतीश बोम्मावार नारायण गद्देवार, मुकेश गुरनुले , प्रमोद भगत प्रकाश गड्डमवार आदी भक्त गणांसह सामाजिक तथा राजकीय कार्यकते उपस्थित होते.
बाबांच्या कार्यकर्तुत्वाने हनुमान मंदिराची महती जिल्ह्यातच नव्हे तर परप्रांतात पोहचली आहे.यात मुरलीधर महाराजांचा सिंहाचा वाटा आहे.
आषाढी पौर्णिमे पासून सदर मंदिर परिसरात धार्मिक कार्याला सुरवात होत असते, त्यामुळे नैसर्गिक वातावरणाने परिपूर्ण आणि वैनगंगा तिरावर वसलेले हे परिसर धार्मिक कार्याने दुमदुमुन जाते, अशी व्याप्ती आणि प्रचिती असलेले हे हनुमान मंदिर असल्याने नेहमीचा या मंदिरात भक्त गणाची रेलचेल दिसते, हजारों भक्तगनानी स़त महाराजांना कोटी कोटी शुभेच्छा दिल्या. अवतरण दिनाची महाप्रसादाने सांगता झाली,अवतरण दिनाच्या यशस्वी ते साठी ट्र्स्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमा दरम्यान आपल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून हनुमान मंदिर देवस्थानाची प्रसिद्धी करणा-या पत्रकारांचा, देवस्थान समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.