ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागतिक आदिवासीदिनी आदिवासीनी एल्गार पुकारला

अल्ट्राटेक सिमेंट हापर बंद पाडले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

      कुसुंबी माणिकगड सिमेंट कंपनीचा आदिवासी जमिनीचा वाद गेल्या दहा-अकरा वर्षापासून चर्चेत असून अनेक वेळा आंदोलने निदर्शने बैठका पार पडल्या परंतु प्रश्न सुटता सुटत नाही यामुळे कुसुंबी चूनखड्डी माईन्सच्या अन्यायग्रस्त आदिवासी कोलाम समाजाचे प्रकल्प बाधीत शेतकरी गेल्या गेल्या दहा महिन्यापासून कुसुंबी येथील शंकर देव मूर्ती जवळ माईन क्षेत्रामध्ये कुटुंबासह या आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधत आहे.

गेल्या दहा महिन्यापासून प्रशासनाची भूमिका चालढकल करत असून निवड सभा घेणे चर्चा करणे व प्रश्न जसा आहे तसा ठेवणे हेच प्रकार सुरू आहे जिल्हा प्रशासन गंभीर दखल घेत नसल्याने आदिवासीचा असंतोष उफाळून आला कंपनी गेल्या पाच सहा महिन्यापासून आम्ही मोजणी करण्यास तयार आहोत असे कारण देत गेल्या चार महिन्यापासून निवड भूमापन मोजणी करण्याचा दिखावा कंपनीकडून केल्या जात आहे वास्तविक पाहता मुळात या कंपनीच्या झालेल्या एग्रीमेंट मध्येच घोळ असून वन व महसूल विभागाची तसेच खाजगी जमिनीचे अचूक नकाशे नसल्यामुळे निजाम गाडी नकाशामध्ये जी नोंद आहे त्या नोंदीनुसार प्रत्यक्ष आज चुनखडी खदानीचे कंपनीला कायद्याने लिजकरार करून देण्यात आलेल्या ६४३, ६२ हेक्टर जमीन या पैकी वनविभागाला समर्पित केलेले १५०- ६२ हेक्टर जमीन कुठे आहे हे महसुल व वनविभाग अचूक माहिती उपलब्ध नाही यापूर्वी बॉम्बेझरी च्या कोलाम शेतकऱ्याची सर्व्हे न ४४ ४५ ४६ ४७ ४८ शेत जमीन मोजणी करण्यात आली त्यामध्ये सदर पाचही शेतकऱ्यांचे सर्वे नंबर कंपनीच्या खदानी लगत त्यांच्या सीमेच्या दगडाच्या आत असल्याचे निष्पन्न झाले.

मात्र त्याची क प्रत नकाशा देण्यात आला नाही किंवा ती जागा बाबत भूमापन विभागाने अचूक अहवाल दिला नाही 1978 पूर्वी कोलामांना त्या जमिनी पट्ट्याने देण्यात आल्या होत्या त्याच्यावर कास्ट असताना सुद्धा नव्याने महसूल विभागाने मोजणी केल्यानंतर व भूमापन अशा नकाशा तांबेजरी शिवारात असताना एकत्रिकरण नकाशा मध्ये त्या शेताच्या सर्वे नंबरची नोंद असताना वन विभागाने मोघम अहवाल वनक्षेत्राचा असल्याचा दिला वास्तविक ही जमीन एकदा नव्हे तर दोनदा मोजणी मध्ये त्या अधिवाशांच्या ताब्यात असल्याचे नमूद आहे व तलाठी यांच्याकडे असलेल्या नकाशामध्ये भूमापन मोजणी अहवालामध्ये खदान अशी नोंद देखील करण्यात आली आहे मोजणी होऊन चार महिन्याचा काळ लोटला मात्र त्याचा ताबा अजूनही त्या कोलाम लाभार्थीलादेण्यात आला नाही एकूण जमिनीची भूमापन मोजणी केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही याची जाणीव प्रशासन व कंपनीला असताना सुद्धा जाणून-बुजून आंदोलन रखडण्यासाठी पोलिसांच्या बळाचा वापर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कंपनीकडून केल्या जात आहे.

कंपनीने 493 हेक्टर पेक्षाही अधिक जागेवर कब्जा करून खाजगी व वन जमीन हडपली आहे तब्बल 40 वर्षात या जमिनीची मोजणी करून सीमांकन करणे कंपनीची जबाबदारी होती मात्र कंपनीने या बाबीकडे दुर्लक्ष करत नोकरी येथील 43 हेक्टर जमीन भूपृष्ठ अधिकार प्राप्त न करता थेट खरेदी करून आदिवासीच्या जमिनीवर मालकी हक्क कंपनीने नोंदला आहे मात्र कुसुंबी येथील लीज करार एग्रीमेंट मध्ये बॉम्बेझरी किंवा नोकरीचा कुठेही उल्लेख नाही असे असताना कंपनी आपल्या सीमा क्षेत्राच्या बाहेर बॉम्बेजरीमध्ये उत्खनन केलेले आहे महसुली अभिलेख नोंदी नुसार कुसुंबी येथे फक्त चार हेक्टर ४ .५० आरजमिनीचा सातबारा आहे.

महसुलाच्या नावाने आजही परंपोप सर्वे नंबर सात दहा तेरा 14 15 याची नोंद आहे नेमकी कोण्या सर्वे नंबर मधून किती जमीन कंपनीला देण्यात आली याची अचूक माहिती नाही त्यामुळे कुसुंबी येथील 18 आदिवासी शेतकऱ्यांची टप्प्याटप्प्याने जमीन भडकवून कंपनीने चुनखडी उत्खनन केले आहे याबाबत सतत ओरड होत असताना निवड या आदिवासींचा छळ सुरू असून न्यायिक भूमिका घेऊन न्याय देण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

असा आरोप जन सत्याग्रह संघटने आबीद अली केला असूनसंतप्त आदिवासी कोलामांनी जागतिक आदिवासी दिन आपल्या आंदोलनाचे एल्गार पुकारून माणिकगड सिमेंट कंपनीचे खापर बंद पाडले शासनाचे लक्ष याकडे नसल्याने आजच्या जागतिक आदिवासी दिनी आम्ही बेमुदत ठिय्या आंदोलन हापर मध्ये मांडला असल्याची माहिती भाऊराव कनाके केशव कुळमेथे बाळू सिडाम जंगू पेंदोर जंगू आत्राम बघू मडावी यांच्यासह अनेक महिला पुरुष हापुर मध्ये आपला ठिय्या मांडला आहे.

जोपर्यंत निर्णय होणार नाही आम्ही येथून उठणार नाही अशी भूमिका आंदोलन करते आदिवासी घेतली आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये