रक्षाबंधन निमित्त बहिणींना विशेष उपहार
भारतीय जनता पार्टी महिला आघाडी यांचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन बहिणींना विशेष उपहार देऊन साजरा करण्यात येणार आहे. वरोरा विधानसभा क्षेत्रातील जवळपास एक हजार बहिणींना विशेष उपहार देण्यात येणार आहे. स्थानिक श्री मंगल कार्यालय येथे दिनांक १० ऑगस्ट ला सदर कार्यक्रम होत आहे.
या उपक्रमाकरिता केंद्रित मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार करण देवतळे, वरोरा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचेसुद्धा मार्गदर्शन लाभणार आहे. बहिणींना सुरक्षा मिळावी, त्यांचा आदर सन्मान व्हावा, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवा, यासाठी सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.
भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष श्यामसुंदर उरकुडे, देवानंद जाभूळे,शहर अध्यक्ष सुनील नामोजवार, तालुका महिला आघाडीच्या रक्षिता निरंजणे, शहर महिला आघाडीच्या सौ. वृषाली विनोद पांढरे यांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.