ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तहसील कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून महसूल सप्ताहाची सांगता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती : – राज्य शासनाच्या निर्णयानुसार १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान जिवतीत ‘महसूल सप्ताह २०२५’ साजरा करण्यात आला असून (दि.७) गुरुवारी M sand बाबत जनजागृती करण्यात आली. आणि तहसील कार्यालयाच्या परिसरात कर्मचाऱ्यांचे हस्ते वृक्षारोपण करून महसूल सप्ताहाची सांगता करण्यात आली. यावेळी तहसीलदार रुपाली मोगरकर, नायब तहसीलदार, निरीक्षण अधिकारी यांचेसह कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

     जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार रुपाली मोगरकर यांच्या नेतृत्वात जनता व प्रशासन यांच्यातील विश्वास दृढ करणारे विविध यशस्वी उपक्रम राबविण्यात आले. महसूल दिनाने महसूल सप्ताहाचा शुभारंभ झाला. गतिमान प्रशासनासाठी उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. तालुक्यातील सर्व मंडळात पांदण रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत विविध विभागातील विविध योजनांतील पात्र लाभार्थ्यांना शासकीय लाभासह प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

     आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकास्तरीय उपक्रमात आमदार भोंगळे व तहसीलदार मोगरकर यांच्या हस्ते दोन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना प्रत्येकी एक लाख प्रमाणे मंजूर अनुदानाचा लाभ देण्यात आला. नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले. सोबतच विविध योजनांविषयी माहिती देण्यात आली. तसेच विशेष सहाय्य अनुदान योजनेच्या डिबिटी न झालेल्या लाभार्थीना गृहभेटी देऊन डिबिटी करण्यात आले.

तसेच ज्यांचे आधार प्रामाणिकरण झालेले नाही ते करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. विविध योजना व उपक्रम जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न असून यापुढेही अशा उपक्रमात सातत्य राखले जाईल असे तहसीलदार रुपाली मोगरकर यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये