जुन्या बस स्थानकावरील २०० वर्षे जुने कडुनिंबाचे झाड अचानक कोसळले
मोठा अनर्थ टळला
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील जुना बस स्थानक परिसरातील २०० वर्षापूर्वीचे जुने जीर्ण झालेले व मुख्य रहदारीच्या ठिकाणी असलेले कडुनिंबाचे झाड अचानक कोसळले. परिसरातील नागरिकांची सतर्कतेने व महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने लागलीच विद्युत पुरवठा खंडित केल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना शनिवार दिनांक ९ ऑगस्टला दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
दररोज प्रमाणे फळ विक्रेता नरेश नागपुरे यांनी जुना बस स्थानक परिसरातील. व २०० वर्षे जुन्या कडूलिंबाच्या झाडाखाली आपला फळ व भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. त्याला अचानक २०० वर्ष जुने कडुनिंबाचे झाड हळूहळू आवाज करून झुकत असल्याची चाहूल लागली. तेव्हा त्याने आपला फळाचा हाथ ठेला दूर करून मुख्य रहदारीच्या रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा करीत होता. लागलीच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला सूचना करून विद्युत खंडित केली. वीज कर्मचारी याकडे लक्ष देऊन होते काही क्षणातच सदर झाड कोसळले.
दरम्यान कोणी व कोणतेही वाहन न गेल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती नगरपरिषदेला व पोलिसांना मिळताच त्याठिकाणी जमावास पांगऊन पोलिसांनी वाहतूक सुरळीत सुरू केली.तर नगरपालिकेने तात्काळ झाड तोड पथकास बोलावून झाडाचे विल्हेवाट लावली.