विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघाच्या उपाध्यक्षपदी भद्रावतीचे नंदू पढ़ाल यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०१४ च्या नियम ३२ नुसार, शनिवार, २६ जुलै रोजी नागपूर येथे झालेल्या २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीसाठी झालेल्या विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघाची निवडणूक पार पडली.
शुक्रवार दि.८ ऑगस्टला नागपूर येथे पार पडलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भद्रावती येथील माजी नगरसेवक तथा मच्छिंद्र मच्छूआँ सहकारी संस्थेचे स्वीकृत सदस्य तसेच सहकार पॅनलचे उमेदवार नरेंद्र उर्फ नंदूभाऊ महादेव पढाल हे एक मताने विजयी झालेत.यात पढाल यांनी ९ मते घेतली तर त्यांचे प्रतिस्पर्धी वासुदेव सूरजूसे यांनी ८ मते घेतली.सुरजुसे यांचा एक मताने पराभव झाला.
तसेच अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रेमकुमार गजपुरे व उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती त्यांनी प्रत्येकी ९-९ मते घेतली.घेण्यात आलेल्या ईश्वर चिठ्ठीत प्रेमकुमार गजपुरे हे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाले. या निवडणूक प्रक्रियेचे काम निवडणूक निर्णय अधिकारी सुदाम रोकडे यांनी पाहिले. त्यांच्या या निवडीचे विदर्भ स्तरावर अभिनंदन केला जात आहे.