ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जाफराबाद चौफुलीवर कार व ट्रकचा भीषण अपघात 

एक महिला ठार,4 जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील जाफराबाद चौफुलीवर 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता कार व ट्रक चा भीषण अपघात झाला, यात कारमधील महिला ठार झाली असून इतर 4 जण जखमी झाले आहे. मृतक महिलेचे नाव शोभा बद्रीनाथ रांदड,वय 55 वर्ष आहे.

बीड जिल्ह्यातील भाविक कार ने शेगाव येथे दर्शनासाठी निघाले असताना कार रस्तावर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली.

अपघात होताच नागरिकांनी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले, अपघाताचे वृत्त कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी मनिषा कदम व पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी घटनास्थळी पोहोचले, जखमींना जालना येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

अपघात ग्रस्त या चौफुलीवर सातत्याने अपघात होत असल्याने प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये