ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालयात शिक्षक पालक सभा संपन्न  

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे सत्र 2025 -26 या सत्रातील शिक्षक पालक सभा संपन्न झाली.या सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र कुमार ताकसांडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक राजेश मांढरे,प्रा. विजय मूपीडवार प्रा.मेरकूरे, मनीषा मोरे मॅडम, बावने साहेब उपस्थित होते.

याप्रसंगी वर्ग दहावी बारावीच्या निकालांचे वाचन करण्यात आले तसेच बोर्ड परीक्षेच्या निकाल उंचावण्याबाबत जादा तासिका घेणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने सभेमध्ये चर्चा करण्यात आली.सभेमध्ये पालक सर्वस्वी शेख,खडसे,यांचा सह प्रा. जाहीर सय्यद, ज्योती चटप ,मोरे मॅडम, बावने साहेब,यांनी आपले विचार व्यक्त केले ,सभेचे अध्यक्ष प्राचार्य महेंद्र कुमार ताकसांडे यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगी प्रगती करण्यासाठी सर्व पालक शिक्षक यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सभेचे संचालन प्रा सातारकर यांनी केले प्रस्ताविक राजेश मांढरे यांनी तर आभार प्रदर्शन जीवन आडे यांनी केले, कार्यक्रमासाठी पालक वर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये