ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ स्थापन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ,गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदुर येथे शालेय मंत्रीमंडळांची लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली.तसेच प्रत्यक्ष मतदान करून विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी निवडून दिले. विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियांचा अनुभव घेता आला. शालेय मंत्रिमंडळात शालेय मुख्यमंत्री पदी कु.लाईबा शेख, उपमुख्यमंत्री कु. साक्षी मडावी, शिक्षणमंत्री सुहाना पाटील ,क्रीडामंत्री सानिध्य चापले, सांस्कृतिक मंत्री रागिनी चौधरी ,स्वच्छतामंत्री कु. श्रीयशी मडावी,पर्यावरणमंत्री साहिल वासेकर, संरक्षण मंत्री अंकिता गेडाम हे विद्यार्थी प्रत्यक्ष मतमोजणीनंतर निवडून आले, सदर निवडणूक शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र कुमार ताकसांडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

निवडणुकीच्या कामात शाळेतील शिक्षक श्री जी.एन.बोबडे श्री. जे. जी. आडे, सी.एम. किनाके एस पाटील, कुमारी सुषमा शेंडे कुमारी एम डी उंमरे,कुमारी बी जे चटप,गोपनवार मॅडम ज्योती मोरे, बी एम मरसकोले, प्रियंका उरकुडे, स्नेहल चांदेकर,लिलाधर मत्ते,पी एल पुंजेकर,सशीकांत चन्ने, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले या वेळी विद्यार्थ्यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यात आले तसेच शालेय मंत्रिमंडळातील निवडणूकीत निवडूनच आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये