ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना स्त्रीरोग तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन

मनपा आरोग्य विभागाद्वारा जागतिक स्तनपान आठवडा साजरा

चांदा ब्लास्ट

दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हे सात दिवस जागतिक स्तनपान आठवडा म्हणून जगात साजरा केले जातात. याअंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य विभागाद्वारे 7 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धिनी केंद्रात गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना स्त्रीरोग व बालरोग तज्ञांद्वारे मार्गदर्शन करून स्तनपान आठवडा साजरा करण्यात आला.

    यावर्षीच्या जागतिक स्तनपान सप्ताहासाठी “स्तनपानाला प्राधान्य द्या:शाश्वत समर्थन प्रणाली तयार करा” ही थीम निश्चित करण्यात आली असुन हा सप्ताह सक्षमपणे राबविण्यासाठी केंद्र शासनाने सुचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुषंगाने मनपा आरोग्य विभागाद्वारे गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना

डॉ. वृषाली बोंडगुलवार,डॉ. वंदना रेगुंडवार,डॉ. कल्याणी दीक्षित,डॉ. धनश्री शेंडे,डॉ. ऋचा पोडे,डॉ. कीर्ती साने,डॉ. उषा अरोरा,डॉ. ज्योती बोरकर,डॉ. सोनाली कपूर,डॉ. शर्मिली पोद्दार,डॉ. अभिजित संखरी,डॉ. समृद्धी वासनिक,डॉ. नयना उत्तरवार या स्त्रीरोग व बालरोग तज्ञांद्वारे तसेच सर्व मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे आरोग्य शिक्षण देण्यात आले. यात स्तनपानाचे महत्व काय? स्तनपानामुळे बाळाला काय फायदे होतात, गरोदर स्त्रियांनी काय पोषक आहार घ्यायला हवा व स्वतःची काळजी कशी घ्यावी यासंबंधी मार्गदर्शनही करण्यात येत आहे.

    आज पूर्ण विश्‍वामध्ये स्तनपानाला विशेष महत्व दिले जाते आहे. प्रत्येक स्त्रीला स्तनपान, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी हे कळणे महत्त्वाचे आहे. दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हे सात दिवस जागतिक स्तनपान आठवडा म्हणून जगात साजरा केले जातात.1990 साली इटलीतील फ्लोरेंस येथे जागतिक आरोग्य संघटना, UNICEF आणि इतर संघटनांनी एकत्र येऊन इनोसेंटी डिक्‍लेरेशनवर स्तनपानाला महत्त्व देण्यासाठी,वाढवण्यासाठी शिक्कामोर्तब केले. त्यानंतर दरवर्षी जगात स्तनपानाचे महत्त्व जोपासण्यासाठी हा आठवडा साजरा केला जातो. दरवर्षी स्तनपानाला जोडून वेगवेगळी संकल्पना घेऊन स्तनपानाचे समर्थन, संरक्षण, वृद्धीकरण करण्यासाठी जगभरात खुप सामाजिक कार्यक्रम घेतले जातात.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये