ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कार्यकर्त्यांनी आमदाराला फिरवला फोन एक्स-रे मशीन उपलब्ध

कोरपना ग्रामीण रुग्णालयात नवीन एक्स-रे मशीन कार्यान्वित; महिनाभराची रुग्णांची अडचण संपली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना तालुक्यातील प्रमुख व अत्यावश्यक आरोग्य सुविधा असलेल्या ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे मशीन गेल्या महिनाभरापासून नादुरुस्त असल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. हाडांचे फ्रॅक्चर, छाती व फुफ्फुसांच्या आजारांचे निदान, अपघातग्रस्तांचे तात्काळ तपासणी आदींसाठी एक्स-रे तपासणी ही अत्यंत महत्त्वाची असते.

मात्र, मशीन नादुरुस्त असल्याने रुग्णांना तपासणीसाठी गडचांदूर, राजुरा, चंद्रपूर येथील सरकारी व खासगी रुग्णालयांचा मार्ग धरावा लागत होता. यामुळे वेळ, पैसा आणि शारीरिक कष्ट या तिन्हींचा त्रास रुग्णांना होत होता.

कोरपना ग्रामीण रुग्णालय हे तालुका पातळीवरील महत्त्वाचे सरकारी आरोग्य केंद्र आहे. येथे केवळ कोरपना शहरातीलच नव्हे तर परिसरातील शेकडो गावांमधील रुग्ण येतात. अपघात, हाडे तुटणे, क्षयरोग, निमोनिया, कर्करोगाच्या प्राथमिक तपासण्या अशा अनेक बाबतीत एक्स-रे सुविधा ही प्रथमोपचारासाठी जीवनदायी ठरते.

दरम्यान, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष व ओम पवार यांनी ही समस्या राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून लक्ष वेधले. यावर आमदारांनी आरोग्य यंत्रनेशी संपर्क साधून तातडीने पावले उचलत नवीन एक्स-रे मशीन रुग्ण सेवेत उपलब्ध करून दिली आहे.. अल्पावधीतच नवीन मशीन बसविण्यात आले असून आता रुग्णांना पूर्ववत तपासणी सुविधा मिळणार आहे.

यामुळे अपघातग्रस्त व गंभीर रुग्णांच्या उपचारात होणारा विलंब टळणार असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा खर्च वाचणार आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांनी आमदार भोंगळे यांच्या कार्य तत्परतेचे कौतुक केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये