लखमापूर येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
लखमापूर युवक मंडळ यांच्या माध्यमातून रोशन कोंडेकर यांनी स्मशानभूमीतील परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विविध वृक्षांची लागवड करण्यात आली, याप्रसंगी गावचे सरपंच अरुण जुमनाके ग्रा. पं. सदस्य प्रमोद सीडाम प्रा. सुधीर थिपे,संदीप बावणे,शंकर उरकुंडे, अनिकेत उलमाले, अक्षय थी पे,राहुल जुनघरे प्रणय काकडे, समाधान वासाडे, अभय येट,शुभम ऊरकुंडे, जयदीप ठावरी, अमीत थिपे, शंतनु पोतराजे, अमित गव्हाणे,भोजेकर असे असंख्य गावातील युवक याप्रसंगी उपस्थित होते.
स्मशानभूमीला एक नैसर्गिक पार्क बनवण्याचा मानस या युवकांचा बऱ्याच दिवसापासून आहे. दरवर्षी 200 झाड लावणे, आणि ते जगविने अशा प्रकारचा निर्धार या युवकांनी घेतला आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याचे गावकऱ्यांच्या वतीने सर्वत्र कौतुक होत आहेत.