घुग्घुस : मोफत शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची ७४ वी तुकडी रवाना

चांदा ब्लास्ट
घुग्घुस : येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र आणि आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रातर्फे ७ ऑगस्ट रोजी दुपारी, या सेवा केंद्रातून विविध आजारांच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची ७४ वी तुकडी रवाना करण्यात आली. या उपक्रमाचे मार्गदर्शन आमदार देवराव भोंगळे आणि भाजप जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी केले.
सर्व रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र करणार आहे. नुकतेच आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस शहरात भव्य महाआरोग्य शिबीर पार पडले. या शिबिरात रुग्णांची नि:शुल्क तपासणी करण्यात आली होती. यातील नकोडा परिसरातील पात्र रुग्णांना विविध आजारांच्या शस्त्रक्रियेसाठी आचार्य विनोबा भावे (सावंगी मेघे) रुग्णालयात पाठविण्यात आले.
यावेळी नकोड्याचे सरपंच किरण बांदूरकर, भाजप नेते गणेश कुटेमाटे, आकाश निभ्रड, बबलू सातपुते, इर्शाद कुरेशी, हनुमान खडसे, संदीप तेलंग आदी मान्यवर उपस्थित होते.