800 रुपये द्या अन बनावट कागदपत्रांच्या आधारे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र बनवा
पाथरी ग्रामपंचायतच्या संगणक परिचालकाचा प्रताप...

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सोशल मीडियावर अडिओ क्लिप वायरल..
सावली तालुक्यातील पाथरी येथील ग्रामपंचायत मधील कॅम्पुटर ऑपरेटरने बनावट कागदपत्राच्या आधारे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट केस तयार करण्याकरिता एका उमेदवाराकडून जास्त पैसे एटल्याची ऑडिओ क्लिप प्रसार माध्यमावर वायरल झाल्यामुळे सामान्य जनतेची पीळवणूक होत असल्याची बाब सामोर आलेली आहे.
पाथरी ग्रामपंचायत कार्यालय येथे रवींद्र पासकंटिवार हे कॅम्पुटर ऑपरेटर असून त्यांच्याकडे सेतू केंद्र आहे पाथरी व परिसरातील नागरिक शासकीय निमशासकीय तसेच ऑनलाईन कामा करीता तसेच विविध दाखल्या करिता ग्रामपंचायत कार्यालयात येऊन ऑनलाईन असलेली आपली कामे करतात याच्याच फायदा घेत संगणक चालकांनी शासकीय फी पेक्षा जास्त रक्कम नागरिकाकडून घेने खोटे दास्तावेज सादर करून बनावट प्रमाणपत्र देत असल्याची बाब सोशल मीडियावरील प्रसारित झालेल्या ऑडिओ क्लिप वायरल झाल्याने उघडकीस आली या क्लिपमध्ये एका शैक्षणिक उमेदवाराकडून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढून देन्या करिता त्या उमेदवाराकडून आठशे रुपये घेण्यात आलेले होते.
यावर एका व्यक्तीने त्या संगणक चालकाला विचारणा केली की नॉन क्रिमिनल करिता आठशे रुपये कसे काय घेतले यावर संगणक चालक म्हणतो की उमेदवाराकडे परपूर्ण डॉक्युमेंट नसल्याने त्यामुळे त्यांच्याकडून माझी फीस आठशे रुपये घेतले यावर पुन्हा त्या व्यक्तीने त्यास म्हणाले की कोणते डॉक्युमेंट बनवून दिले ते सांग व ते डॉक्युमेंट्स तू कोणत्या आधिकाऱ्याखाली बनवून दिले म्हणजेच फेक डॉक्युमेंट्स बनवून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची केस तयार केलेली आहे त्यामुळे तु त्या उमेदवाराकडून आठशे रुपये घेतलेस यावर संगणक चालक म्हणतो की ठीक आहे मी दिलेले टोकन कुठे वापरू नकोस व तुझे घेतलेले पैसे मी परत करणार यामुळे या ऑडिओ क्लिप च्या माध्यमातून संगणक चालकाचे पितळ उघडे पडले असल्याने अशा किती नागरिकांची फेक सर्टिफिकेट तयार करून दिलेली असेल व त्यांच्याकडून किती पैसे ऐटला असेल याची सत्यता चौकशी केल्यावरच समोर येणार या सगळ्या बाबीचा खुलासा झाल्यावरच संगणक चालक दोषी आढळल्यास खोटी कागदपत्रे तयार करणे हा कायदेशीर गुन्हा असून संबंधित आपरेटरवर शिस्तभंगाची कारवाई ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्या कडून केली जाईल काय की तेरी भी चूप और मेरे भी चुप अशी भूमिका बघावयास मिळणार काय याकडे आता सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
प्रसार माध्यमावर ऑडिओ क्लिप वायरल झाली ही बाब सत्य असून मासिक सभेत विषय घेऊन तात्काळ चौकशी लावून दोषी आढळल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येईल.
अनीताताई लोकनाथ ठीकरे, सरपंच, ग्रामपंचायत पाथरी.