आदर्श विद्यालय राजुरा येथे गुरू गौरव उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- राज्य शासनाच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या अनुगामी लोकराज्य महाअभियान अर्थात अनुलोम या सामाजिक संस्थेव्दारा गुरू गौरव उपक्रम राजुरा भागात होते आहे.स्थानिक आदर्श विद्यालय राजुरा येथे गुरू गौरव कार्यक्रम साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांना गुरू-शिष्य या नात्याची समज व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जांबुळकर गुरूजी होते.प्रमुख अतिथी म्हणून विद्यालय शिक्षक विकास बावणे,नवनाथ बुटले, सतिश मुसळे अनुलोम जनसेवक राजुरा, शाळेच्या शिक्षीका आशा बोबडे,मणिषा खामनकर, जयश्री शिवनकर,पुजा ढेंगळे,शितल भेंडाळे उपस्थित होते.
राजुरा भाग जनसेवक सतिश मुसळे यांनी गुरू गौरव कार्यक्रमाची महती सांगुन अनुलोम उपक्रमाची कार्य मिमांसा आपल्या प्रास्ताविकेत विशद केली.
गुरु आपल्या शिष्याला योग्य मार्ग दाखवितो,त्याला स्वार्थाकडून परमार्थाकडे नेणे तथा सद्गुरूच्या जवळ जाण्याची वाट दाखविण्याचे पवित्र कार्य गुरू करीत असतो,असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष जांबुळकर गुरूजी यांनी आपल्या मार्गदर्शनात विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक विकास बावणे यांनी केले.
कार्यक्रमाला शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.