ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
38 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
भद्रावती तालुक्यातील मुरसा येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
एका 38 वर्षीय महिलेने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या राहत्या घरातच पंख्याला दोराच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 3 रोज रविवारला तालुक्यातील मुरसा येथे घडली. पिंकी मोरेश्वर कोडापे, वय 38 वर्ष, राहणार मुरसा असे या आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. सदर महिलेवर कर्ज असल्यामुळे ती सतत चिंतेत राहायची.
घटनेच्या दिवशी पती शेतावर गेल्याची संधी साधून तिने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. तिच्या मागे एक मुलगा व एक मुलगी आहे. भद्रावती पोलिसांनी घटनेचा मर्ग दाखल केला असून पुढील तपास ते करीत आहे.