ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भद्रावतीच्या बॉक्सर मुलीनी घडविला नवा इतिहास
मुलींच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पटकाविले सुवर्ण पदक : राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेकरीता कु. सिद्धी आमने ची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
जळगाव येथे सुरू असलेल्या 15 वर्षाखालील मुलींच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या बॉक्समध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील कु. सिद्धी नितीन आमने या 15 वर्षाच्या लहान मुलींनी राज्यातील सर्व मुलींना हरवून सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
नोएडा येथे होणाऱ्या 15 वर्षाखालील राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेकरीता जिल्ह्यातील प्रथम राष्ट्रीय बॉक्सर म्हणून नवीन इतिहास तयार केलेला आहे.
या घवघवीत यशाचे श्रेय तिने आई वडील, आमने परिवार व चंद्रपूर जिल्ह्यातील बॉक्सिंग प्रशिक्षक लता इंदूरकर व त्यांचे सहकारी बॉक्सिंग प्रशिक्षक रोहन मोटघरे यांना दिले असुन कु. सिद्धी हिचे संपूर्ण जिल्ह्यात अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.