अण्णाभाऊंचे साहित्य स्वाभिमान शिकवते _ लहूशस्त्र सेनाप्रमुख संजूबाबा गायकवाड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
विश्वविख्यात साहित्यीक साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त देऊळगाव राजा येथे बस स्थानक परिसरात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ सुनिल भाऊ लोखंडे मित्र मंडळाच्यावतीने भव्य दिव्य जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पुजन करण्यात आले व शहरातील सर्व जयंती उत्सव समिती पदाधिकाऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित समाजबांधवांना प्रा.शाम मुडे व संजूबाबा गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी अण्णाभाऊंच्या स्मारकासमोर बस स्टॅंड चौकात भव्य दिव्य लाईट शो व डी जेचे आयोजन करण्यात आले होते.देऊळगाव राजा व परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.
शहरातील पिंपळनेर, लहूजी नगर,महाराणा प्रताप नगर व संजय नगर येथून भव्य दिव्य अशा अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.सर्व समाज बांधवांनी एकत्र येवून याठिकाणी महामानवांच्या नावाचा जयघोष करत उत्साहात व मोठ्या आनंदाने जन्मोत्सव सोहळा साजरा केला.
जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार मनोज भाऊ कायंदे यांचे बंधू सतिश भाऊ कायंदे,तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डाॅ.शशिकांत खेडेकर,माजी नगराध्यक्ष संतोष भाऊ खांडेभराड, उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम,पोलीस निरीक्षक ब्रह्म गिरी,लहूशस्त्र सेना प्रमुख संजूबाबा गायकवाड, क्रांतिगुरु लहूजी साळवे विकास परिषद प्रदेशाध्यक्ष प्रमोद कांबळे,सत्यशोधक शिक्षक सभा अध्यक्ष प्रा.शाम मुडे,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष प्रा.दिलीप झोटे,पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशिर भाई कोटकर,शिवसेना नेते दिपक बोरकर,समाजभुषण दिलीप भाई खरात,पत्रकार संतोष जाधव,प्रा.माधव बुरकुल, डॉ.उमेश मुंढे,शेषराव भाऊ बारवकर, शिवसेना शहर प्रमुख गोपाल व्यास,भीमशक्ती विदर्भ उपाध्यक्ष दिपक कासारे,पवन डोईफोडे,प्रदीप वाघ,शिवसेना मिडीया विभाग प्रमुख सचिन व्यास,रि.पा.ई. जिल्हाध्यक्ष शरद भाई खरात,गणेश हांडे पाटील,श्रीमंत निकाळजे सर,आकाश कासारे,गजानन दंडे,राजू नाडे,गजानन अवसरमोल, संदीप ससाने,बबन लोखंडे,भगवान तात्या खांडेभराड, सतिश अंभोरे,सुनिल पवार,सरपंच विश्वनाथ घाडगे,किशोर कांबळे,सिताराम गोफणे,सुनिल ससाणे इ.उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिल भाऊ लोखंडे,राजू गोफणे सर,प्रविण हांडे पाटील, रघुनाथ निकाळजे,शरद घाडगे,लखन लोखंडे,शाम लोखंडे,गजानन अंभोरे,दद्या अंभोरे,गजानन निकाळजे,अमोल पवार,अजय लोखंडे,योगेश अंभोरे,सागर लोखंडे,उमेश अंभोरे,विशाल जाधव,विशाल तिडके,गजानन लोखंडे,भरत साबळे,ऋषी ससाणे,रघूमामा वाघमारे,सोनू लोखंडे,सतिश हिवाळे,अर्जुन लोखंडे,कृष्णा उकंडे,विठ्ठल पाटोळे,नंदू लोखंडे,किशोर गायकवाड, पवन खरे,गजानन घाडगे,विठ्ठल दंडे,किरण दंडे,नितिन दंडे,नितिन चव्हाण इ.नी परिश्रम घेतले.