Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

एन्ड्युरन्स चंद्रपूर जिल्हा चॅम्पियनशिप स्पर्धा संपन्न 

जिल्ह्यातील 120 स्केटर्सचा सहभाग ; राज्यस्तरीय विजेत्यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

चंद्रपुरात नुकतीच एन्ड्युरन्स चंद्रपूर जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. चंद्रपूर जिल्हा एन्ड्युरन्स असोसिएशनने आयोजित केलेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील 120 स्केटर्सनी सहभाग घेतला,त्यात चंद्रपूर शहर, चंद्रपूर ग्रामीण, भद्रावती, बल्लारपूर, वरोरा येथील स्केटर्सचा समावेश होता. स्थानिक कोहिनूर स्केटिंग मैदानावर ही स्पर्धा पार पडली.

5 वर्षे ते 16 वर्षांवरील अशा एकूण 9 वयोगटात आणि 6 विविध गटात झालेल्या या स्पर्धेत सहभागी स्केटर्सनी त्यांच्यातील सहनशीलता दाखवून पदके जिंकली. सर्व वयोगटातील प्रथम 5 विजेत्यांना आकर्षक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक देऊन गौरविण्यात आले तसेच सर्व सहभागी स्केटर्सना प्रमाणपत्र देण्यात आले. 11 व 12 जानेवारी 2025 रोजी मुंबई येथे होणाऱ्या एन्ड्युरन्स राज्यस्तरीय स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्हा संघात विजेत्यांची निवड करण्यात आली आहे.

एन्ड्युरन्स चंद्रपूर जिल्हा स्पर्धेचे उद्घाटन श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू कुंदन नायडू यांच्या हस्ते करण्यात आले.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत स्थानिक अमेय स्केटिंग अकादमीने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वाधिक पदके पटकावली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी एन्ड्युरन्स चंद्रपूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आतिश धुवई, उपाध्यक्ष सुमित बुटले, सचिव सोनी निसपाल, खजिनदार विशाल चव्हाण, राजेश आयरणे, अनिल दडगल यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये