ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी विद्यालय येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक श्री विजय डाहुले पर्यवेक्षिका माधुरी मस्की, समिती प्रमुख प्रा नंदा भोयर उपस्थित होत्या.
सर्वप्रथम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,मयुरी माकोडे यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे संचालन श्री वामन टेकाम यांनी केले तर आभार प्रदर्शन तुकाराम धुर्वे यांनी केले या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



