देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, स्व भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, जनसेवा सामाजिक संघटना व जेष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
विरंगुळा भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष बळीराम मापारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून स्व भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष प्रकाश खांडेभराड, मधुकरराव धुळे, प्रा अशोक डोईफोडे, गोविंदराव अहिरे होते. याप्रसंगी शांतीलाल निरफळे, पंडितराव पाथरकर, रमेश नरोडे, प्रकाश अहिरे, गोविंदराव बोरकर, प्रा विजय रायमल, राम चौधरी, घनश्याम भंडारे,बाबुलाल शिवरकर, रमेश गवई, बाबुराव नागरे, तथा इतर उपस्थित होते.
सर्वप्रथम क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव गोविंदराव बोरकर यांनी केले.



