ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सर्पदंशाने युवकाचा मृत्यू ; हिंगणी गावात शोककळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेलू तालुक्यातील धामणगाव (हिंगणी) येथील प्रमोद रामचंद्र किरडे (वय ३७) यांचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना त्यांच्या राहत्या घरी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद किरडे यांना सर्पदंश झाल्यानंतर तातडीने सेवाग्राम रुग्णालयाकडे उपचारासाठी नेण्यात येत होते. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

प्रमोद किरडे हे पेंटिंग व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून हिंगणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये