ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अण्णाभाऊ साठेंनी साहित्यातून वंचित, शोषित उपेक्षितांच्या वेदना मांडल्या – माजी आमदार डॉ. शशीकांत खेडेकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठेंचा लढा हा समाज परिवर्तनाचा होता.अण्णाभाऊंनी अन्याय विरुद्ध लढा उभारून शोषित, वंचित उपेक्षितांच्या वेदना आपल्या साहित्यातून मांडल्या असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती उत्सवानिमित्त लहुजी मित्र मंडळ पिंपळनेर( दे. राजा) आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लिखित फकिरा कादंबरी वाटप व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष वाटप कार्यक्रमाप्रसंगी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर होते.

तर प्रमुख अतिथी जेष्ठ नेते तुकाराम खांडेभराड,शाहू फुले आंबेडकर आझाद विचार मंच अध्यक्ष डॉ.रामप्रसाद शेळके, प्रा.श्याम मुडे, पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, देऊळगाव राजा ठाणेदार ब्रह्म गिरी, ए. पी.आय आशिष रोही, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, युवानेते योगेश जाधव, शिवसेना नेते दिपक बोरकर,राष्ट्रवादी नेते गणेश सवडे, गजानन पवार,शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिनकर खरात,भाई दिलीप खरात,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, शिवसेना तालुका अध्यक्ष सुदाम काकड, गोपाळ व्यास डॉक्टर उमेश मुंडे,प्रा.दिलीपकुमार झोटे,अजहर शेठ, युवानेते आकाश कासारे, प्रभाकर धोंगडे,विजय खांडेभराड, अँड अर्पित मीनासे, अभय दिडहाते, समाधान बंगाळे, शरद खरात, धनश्रीराम शिंपणे,पत्रकार सुषमा राऊत, पत्रकार सुरज गुप्ता, पत्रकार अशोक जोशी, पत्रकार संतोष जाधव मंगलबाई निकाळजे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी सत्यशोधक चळवळीतील गाढे अभ्यासक, प्रा. शाम मुडे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकताना समाजाने दिशाहीन न होता शिक्षणाकडे वळले पाहिजे शिक्षणचं समाजाला दिशा देण्याचे काम करते असे प्रखड मत त्यांनी व्यक्त केले.त्याचबरोबर कु. नक्षत्र म्हस्के हिने देखील अण्णाभाऊ साठे यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी लहुजी मित्र मंडळाचे अध्यक्ष सुनिल लोखंडे, पाणीवाले राजू कांबळे,राजू नाडे,मंगल अंभोरे, नितीन पाटोळे,मुकेश आघाम,राम अवसरमोल, राम लोखंडे, सचिन अवसरमोल, संजय लोखंडे, दीपक गोफणे,सतीश पाटोळे,सुशील दंडे, रोहन कांबळे,प्रदीप साळवे,श्याम लोखंडे,राहुल साळवे, मोहन पाटोळे, राजू पाटोळे, विठ्ठल पाटोळे,संदीप ससाने, भिकाजी पाटोळे, बबन लोखंडे,आकाश अंभोरे, संतोष आघाम,राजू दाभाडे,विष्णू आघाम, आकाश आघाम, अर्जुन अंभोरे, गजानन अवसरमोल,शिवा अवसरमोल, लकी असरमोल,विष्णू अंभोरे, अतिश दंडे, राजू तोडे, भरत कांबळे, रामू भदर्गे,विष्णू पाटोळे, दत्ता टकले, प्रभाकर राऊत, भागवत मस्के,संतोष लोखंडे, भगवान खांडेभराड,बबन लोखंडे,सयाबाई ससाने,ज्योती पाटोळे,मंगलबाई लोखंडे,मथुराबाई निकाळजे,दुर्गाबाई पाटोळे,मंदाबाई गोफणे,प्रियांका लोखंडे,वच्छलाबाई साळवे, मीरा लोखंडे, विद्या लोखंडे,जमुना साळवे, सरस्वती साळवे, शितल अवसरमोल, सुनिता ससाने,सरस्वती पाटोळे,खुर्चीत बी सय्यद नजीर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत निकाळजे यांनी केले तर आभार युवा नेते राजू कांबळे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये