माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू धर्माबाबत केलेल्या आक्षेपार्ह व अपमानजनक विधानाचा युवा सेने तर्फे जाहीर निषेध
हिंदू धर्माचा अपमान सहन करणार नाही! : युवासेना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू धर्माबाबत केलेल्या आक्षेपार्ह आणि अपमानजनक विधानाचा युवासेना च्या वतीने राज्यभर तीव्र निषेध करण्यात आला.
या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून भद्रावती शहरातील गांधी चौक येथे युवासेनेने जोरदार आंदोलन करून हिंदू धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही, असा ठाम इशारा दिला.
हे आंदोलन युवासेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मा. पूर्वेश सरनाईक साहेब यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आले.
यामध्ये विदर्भ सचिव मा. शुभम दादा नवले व युवासेना कार्यकारिणी सदस्य मा. हर्षल भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना जिल्हाप्रमुख मा. आलेख भाऊ रट्टे यांच्या नेतृत्वात आंदोलन यशस्वीरीत्या पार पडले.
युवासैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. हिंदू धर्माच्या भावना दुखावणाऱ्या विधानांचा निषेध करत जर तात्काळ माफी मागितली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
या वेळी हिंदू धर्मावर घाव, सहन केला जाणार नाही!, युवासेना प्रत्येक हिंदूच्या सन्मानासाठी सज्ज आहे!, धर्मद्रोही विचारसरणीविरुद्ध युवासेना रस्त्यावर उतरलेलीच राहील! अश्या घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनात शिवसैनिक सुरज भाऊ शाहा, युवा शिवसैनिक सुमित हस्तक, युवा शिवसैनिक महेश जीवतोडे, उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम, उपशहर प्रमुख मनीष बुच्चे, युवा शिवसैनिक सोनू बोनागिरी, युवा शिवसैनिक राज भाऊ चौहान, पीयुष सिंग, शिवसैनिक संदीप चटपकर, युवा शिवसैनिक रवी भाऊ ढवस, मुनेश्वर बदखल, यश निमसरकर, हेमंत सातपुते व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.