ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मोफत आरोग्य तपासणी शिबिरातून माऊली क्लिनिक ने दिला सामाजिक दायित्वाचा परिचय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा हे ब्रिद जोपासत आज दिनांक ३ ऑगस्ट रोजी भद्रावती येथील डॉ. अनंत मत्ते संचालित माऊली क्लिनिक च्या माध्यमातून तसेच चंद्रपूर येथील प्रसिद्ध डॉ.राहुल नगराळे व त्यांची टीम यांचे सहकार्यातून मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.
जिथे वैद्यकीय उपचार महागडा व सर्वसामान्याच्या आवाक्यापलिकडे जात असताना रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, हृदय रोग इसीजी सारख्या चाचण्या अत्यल्प नाममात्र शुल्कात व इतर आरोग्य तपासण्या मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या .मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक, स्त्री, पुरुष, नागरिकानी मोफत आरोग्य तपासणी चा लाभ घेतला.