ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

होमगार्ड संघाचे वतीने सेवानिवृत्त सैनिकाचा सत्कार व पदोन्नती सभारंभ संपन्न.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड येथील होमगार्ड संघाचे वतीने सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार व पदोन्नती सभारंभ आज दिनांक २८ जुलै रोजी नागभीड पोलीस स्टेशन येथे घेण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष होमगार्ड जिल्हा केंद्रप्रमुख राहुड साहेब, प्रमुख पाहुणे ठाणेदार विजय राठोड, ब्रम्हपुरी पथक अधिकारी पठाण, नाग भीड पथक अधिकारी जक्कानवार, यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात सेवानिवृत्त सैनिक यशवंत महादेव निकुरे, मोरेश्वर बावनकर, लीपिता गुरूनु ले, यांचा भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याचवेळी ठाणेदार विजय राठोड व जिल्हा केंद्रप्रमुख राहू ड साहेब यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ठाणेदार विजय राठोड यांनी कार्यक्रमात होमगार्ड सैनिकांना आपले कर्तव्य पार पाडीत असताना आपले शरीर तंदुरुस्त आणि सेवा प्रामाणिक पने देत राहून सेवा करावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रहुड यांनी सांगितले की होमगार्ड सैनिकां नी आपली सेवा देताना आपली कोणतीही बदनामी होणार नाही असे समजून कर्तव्य पार पाडावे. काही अडचणी निर्माण झाल्या तर त्या समायोजन/तडजोड करून पूर्ण करून घेण्याचा सल्ला दिला. यावेळी सेवानिवृत्त सैनिक यशवंत महादेव निकूरे यांनी सत्कार निरोप समारंभ कार्यक्रमात स्व. अरुण भोले यांचे कार्य आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर आपण सेवा देताना आलेले अनुभव कथन करताना भावूक झाले यातुन सेवा देताना सांगितले की प्रामाणिक आणि कर्तव्य म्हणून योग्य सेवा करावी असे आवाहन उपस्थि तीत असणाऱ्या होमगार्ड सैनिक यांना सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्र संचालन वृषाली खोब्रागडे, यांनी केले तर आभार प्रणय घर डे यांनी केले यावेळी वरिष्ठ पलटण अधिकारी लाखे, पुंडलिक खोकले आणि सर्व होमगार्ड सैनिक हजर होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये