गोंडवाना विद्यापीठाने विद्यार्थी प्रवेशासाठी” कॅरी फॉरवर्ड “योजना राबवावी
गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
– शैक्षणिक सत्र 2023- 24 व 24 – 25 मध्ये विद्यार्थी हिताचा विचार करून त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाने कॅरी फॉरवर्ड या पद्धतीने नुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सवलत दिली होती त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फायदा झाला असून त्यांना निरंतर शिक्षण घेता आले.या योजनेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याने विद्यार्थ्यांना,महाविद्यालयाला आणि विद्यापीठाला शैक्षणिक लाभ झालेला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शैक्षणिक सत्र 2025- 26 करिता कॅरी फॉरवर्ड ही योजना लाऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत गोंडवाना विद्यापीठाने धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन च्या वतीने संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय गोरे आणि सचिव डॉ.विवेक गोर्लावार यांनी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे केली आहे.
विशेष म्हणजे यावर्षी अमरावती विद्यापीठाने व गोवा विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी 100% कॅरी फॉरवर्ड या पद्धतीने नुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना महाविद्यालयाला व विद्यापीठाला देखील होणार आहे. या या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठात शिकणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण,आदिवासी मागास ,दुर्गम ,डोंगराळ व नक्षल प्रभावित भागातील असून त्यांची कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक व इतर अडचणीमुळे त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी असल्याने त्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होत आहे.
त्याचबरोबर महाविद्यालयातील नवीन प्रवेशित विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने त्यात पुन्हा विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होत असल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊन महाविद्यालयावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे व पर्यायाने कमी संख्या असल्याने विद्यापीठाची एकूण संख्या सुद्धा कमी होत आहे
या सर्व परिस्थितीचा विचार करता कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरता त्याला शिक्षणाची संधी देणे हे विद्यापीठाचे कर्तव्य समजून यावर्षी कॅरी फॉरवर्ड योजना लावण्यात यावी अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ एम टीचर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेली आहे.