वन व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हमला करणाऱ्या अतिक्रमण धारकावर कठोर कारवाई करावी _ गजानन पोटे यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
मोताळा तालुक्यातील माळेगाव येथील वन विभागाच्या राखीव जागेवर काही नागरिकांना अतिक्रमण केले होते, सदर अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी 23 जुलै रोजी वन विभाग व पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी गेले असता अतिक्रमण धारकानी मिरची पावडर फेकून सशस्त्र हमला करुण अधिकारी व कर्मचाऱ्यांना जखमी करण्यात आले.
तसेच शासकीय वाहनांची तोडफोड करण्यात आली, शासकीय मालमत्तेचे नुकसान करण्यात आले आहे, या घटनेची सखोल चौकशी करून दोषी अतिक्रमण धारकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी फॉरेस्टर्स आणि फॉरेस्ट गार्ड्स असोसिएशन चे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष गजानन पोटे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे लेखी निवेदनात केली आहे.
निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी बुलढाणा, उप वन संरक्षक बुलढाणा यांना पाठविलेल्या आहेत.