अडलेल्या विद्यार्थ्याना प्रशासनाने सोडले घरापर्यंत
संततधारमुळे तालुक्यातील अनेक मार्ग बंद
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार
सावली तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक लहान मोठ्या नाल्यांना पूर आल्याने वाहतूक बंद पडली आहे.
आज सकाळपासूनच तालुक्यात सतत धार पावसाला सुरुवात झाली. तालुक्यात ११९.५ मिली सरासरी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. सकाळच्या सुमारास शाळा महाविद्यालयात विद्यार्थी आले होते. परंतु सततधार होणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील वाहतूक बंद झाल्याने विद्यार्थ्यांना स्वभावी जाण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे सावलीचे तहसीलदार परिक्षित पाटील,ठाणेदार बोरकर,बिडीओ वासनिक,मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार प्रा.गायकवाड,नगरपंचायतीचे उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार यांचे मार्गदर्शनात महामंडळाची बस, स्कूल बस व रुग्णवाहिकेच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना स्वगावी सोडण्याची व्यवस्था करून दिली त्यामुळे तालुक्यातील जीबगाव, उसेगाव, सिदोळा, लोंढोली, हराबा, पेडगाव, भानसी येथील एकूण ११६ विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वगावी पोहोचविण्यात आले. या स्तुत्यउपक्रमाचे पालकवर्गानी कौतुक केले असून प्रशासनाचे आभार मानले.
यावेळी सावलीचे तहसीलदार परिक्षित पाटील, नायब तहसीलदार मंथनवार, पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी वासनिक, गट शिक्षणाधिकारी खंडारे, नगरपंचायतीचे उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार, नगरसेवक प्रीतम गेडाम, नगरसेवक गुणवंत सुरमवार, नगरसेवक अंतबोध बोरकर, तलाठी सांगूडले, झीटे, चंद्रकांत गेडाम, निखिल दुधे, आकाश खोब्रागडे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.



