जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची काँग्रेस पक्षाची मागणी
तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राज्य शासनाने जन सुरक्षा कायदा आणण्याचे ठरविले आहे त्यामध्ये राज्यशासनाच्या उद्देशाविषयी शंका उपस्थित केली जात आहे, या कायद्यात विरोधी पक्षांनी काही दुरुस्त्या सुचविल्या होत्या परंतु त्या मान्य न करता हा कायदा आणण्यात येत आहे,ज्या कृत्यासाठी हा कायदा आणण्यात येत आहे त्या साठी इतर कायदे अस्तित्वात आहेत, तेव्हा जनसुरक्षा कायदा रद्द करावा अशी मागणी देऊळगाव राजा शहर व तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनात केली आहे.
नायब तहसीलदार सायली जाधव यांना निवेदन देताना शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आतिश कासारे, तालुका अध्यक्ष रामदास डोईफोडे, जेष्ठ नेते रमेश दादा कायंदे,अनिल सावजी हनीफ शहा, गंगाधर भाऊ जाधव, राजेश इंगळे,तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विजय खांडेभराड,शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, गणेश सवडे,हरी मामा शेटे,नासिर भाई जनता सेवा इरफान सय्यद, प्रा. अशोक डोईफोडे, मुन्ना ठाकूर,गजानन पवार,यश कासारे मुबारक खान विनोद पाटील, नवनाथ गोम धरे, मतींन चाऊस,गणेश बु रुकुल, प्रकाश राजे खांडेभराड, अभिनव खांडेभराड, गजानन खांडेभराड,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.