आमदार मनोज कायंदे यांनी विधानसभेत मतदारसंघातील विविध प्रश्न विचारले
माँ साहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सव दिनी 12 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक शासकिय पुजा करावी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आमदार मनोज कायंदे यांनी केली विधानसभेत मागणी
माँ साहेब जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा दरवर्षी 12जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, संपूर्ण राज्यातून माँ साहेब जिजाऊ यांच्या वर प्रेम करणारे लाखो लोक येतात, प्रचंड जनसागर उसळतो. भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, थोर साहित्यिक, विचारवंत यांचे मार्गदर्शन लाभते,
येणाऱ्या 12 जानेवारी रोजी माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी सिंदखेड राजा येथे होणाऱ्या माँ साहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सव ची शासकिय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक करून या सोहळ्यास शासकिय स्वरूप द्यावे अशी मागणी लोकप्रिय युवा तडफदार आमदार मनोज कायंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत शासन दरबारी लाऊन धरली.
सिंदखेड राजा तालुक्यांतील प्रती पंढरपूर असलेल्या श्रीक्षेत्र वैष्णवगड येथे आषाढी एकादशीच्या दिवशी प्रचंड जनसागर उसळतो हजारो भाविक दर्शनासाठी येतात लांबच्या लांब रांगा लागतात, बुलढाणा जालना, अकोला, वाशीम जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने येतात, पुढील वर्षी या ठिकाणी आषाढी एकादशीला शासकीय पुजा पालकमंत्री यांनी सपत्नीक करून या तीर्थ क्षेत्राचे महत्त्व वाढवावे अशी मागणी लोकप्रिय युवा तडफदार आमदार मनोजभाऊ कायंदे यांनी विधानसभेत लाऊन धरली.
श्री क्षेत्र अरण संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदीर विकास आराखड्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती शासनाने तात्काळ 150 कोटी 23 लाख रुपये मंजूर करण्यात आले, लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र भूमीत भक्तांना दर्जेदार सुविधा मिळून मंदीर परिसराचा सर्वांगीण विकास होणार आहे.
स्व हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर सातत्याने सिंदखेड राजा मतदार संघातून गेलेल्या भागात सातत्याने अपघात होत आहे यामुळे रोडवेज इन्फ्रास्ट्रकचर सोल्युशन पुणे या कंपनीने केलेल्या कामाची गुणवत्ता बाबत सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार मनोज कायंदे यांनी केली.
एकीकडे समृद्धी महामार्गाने प्रगतीची अनेक दारे उघडली असताना दुसरीकडे या महामार्गामुळे शेतकऱ्यांना पावसाळ्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, या मतदार संघातील असोला, खळेगाव, पिंपळखुटा, केशव शिवणी, तडेगाव, मांडवा, खळेगाव, देऊळगाव कोळ तसेच इतर अंडरपास मध्ये पावसाचे पाणी साचून दळण वळण च्या समस्या उत्पन्न होत आहे व अनेक जुने वहिवाटी शेत रस्ते या महामार्गामुळे बंद झाले आहेत, याबाबत ठोस उपाययोजना सरकारने कराव्या अशी आग्रही मागणी सभागृहात आमदार मनोज कायंदे यांनी लाऊन धरली.