ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

योगा व भिशी ग्रुप तर्फे विद्यार्थ्यांला आर्थिक मदत 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

योगा व भिशी ग्रुप आनंदवन वरोरा तर्फे एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत अक्षय हरिभाऊ पागृत या विद्यार्थ्याला औषधोपचारास योगा व भिशी ग्रुप सदस्यांनी पाचशे रुपये प्रमाणे निधी गोळा करून औषधोपचारासाठी आर्थिक मदत रुपये 18000 माननीय प्राध्यापक तानाजी बायस्कर शारीरिक शिक्षक आनंदनिकेतन महाविद्यालय वरोरा यांच्या हस्ते देण्यात आली.

     याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय सेवानिवृत्त प्राचार्य श्री शरद जोगी तसेच प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय श्री बंडूभाऊ डाखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत योगा व भिशी ग्रुपचे सर्व सन्माननीय देणगीदार प्रामुख्याने उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रास्ताविक पर भाषण योगा भीशी ग्रुपचे प्रमुख श्री रमेश ढवस जिल्हा परिषद हायस्कूल भटाळा यांनी सहयोग राशी वितरणाबद्दल भूमिका समजावून दिली. प्राध्यापक तानाजी बायस्कर, सेवानिवृत्त प्राचार्य श्री शरद जोगी, श्री बंडू भाऊ डाखरे यांनी मनोगत व्यक्त केले

सर्वांचे आभार श्री राजेंद्र पांडे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमसडा यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये